रानमळा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिरात विविध उपक्रम
1 min read
रानमळा दि.२२:- रानमळा येथे दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची बीपी (BP), सीबीसी (CBC), हिमोग्लोबिन (HB), आरबीसी काउंट, ल्यूकोसाइट काउंट, प्लेटलेट काउंट, पीसीव्ही (PCV), एमसीव्ही (MCV), पॉलिमॉर्फ्स, बॅसोफिल्स व मोनोसाइट्स आदी तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र बेल्हे येथील माननीय डॉक्टर किरण गायखे व अक्षय जोरी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) यांच्यासह राजेंद्र पवार व नरेंद्र देठे (आरोग्य सहाय्यक), पल्लवी रोकडे (आरोग्य सहायिका), के. आर. पाबळे (गटप्रवर्तक), माननीय कुमारी पौर्णिमा गुंजाळ (स्टाफ नर्स),
निलेश झिने (आरोग्य सेवक), तुषार हुबे, माननीय मानसिंग परदेशी (प्रयोगशाळा तंत्रज्ञ), अजय वाळुंज (हिंद लॅब, मंचर) व स्मिता गुंजाळ (आशा स्वयंसेविका, रानमळा) हे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.यावेळी इंदिरा गांधी हायस्कूल, रानमळा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांच्या समवेत कडलक सर,
थोरात मॅडम व माळवे मॅडम यांच्या उपस्थितीत सहभागी झाले होते. तसेच मौजे रानमळाच्या विद्यमान सरपंच सविता तिकोणे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. नशामुक्ती साठी प्रभातफेरी व पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली.राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांनी रानमळा गावामध्ये प्रभातफेरी काढून नशामुक्तीबाबत जनजागृती केली.
“नशा सोडा – जीवन वाचवा”, “दारू, तंबाखूला नकार द्या”, “निरोगी जीवनाची निवड करा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला.
यानंतर विद्यार्थ्यांनी नशामुक्ती विषयावर पथनाट्य सादर केले.दररोज विद्यार्थ्यांसाठी बौद्धिक व मार्गदर्शनपर व्याख्याने यामध्ये ज्योती दहिफळे – सायबर सुरक्षा,
प्रा. संभाजी ढमाले- पाणलोट विकास व पडीक जमीन व्यवस्थापन, डॉ. माणिक बोऱ्हाडे- महिला सक्षमीकरण, डॉ. राहुल गोंगे- भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी, सचिन भोजने- सामाजिक जडणघडणीत युवकांची भूमिका या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
या सर्व संस्कार शिबिरामध्ये रा.से.यो. स्वयंसेवक यांनी ग्राम स्वच्छता, माती- पाणी परीक्षण, ग्राम सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण,व्यसनमुक्ती यासारखे विविध उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योती गायकवाड, सह कार्यक्रमाधिकारी, प्रा.प्रवीण गोरडे, प्रा.अजय नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्याची माहिती प्रा.अनिल पडवळ यांनी दिली.
