भाजप कार्यकर्ते थेट मंत्री गिरीश महाजन यांच्याच अंगावर
1 min read
नाशिक दि.२७:- माजी महापौर विनायक पांडे,माजी महापौर यतीन वाघ,माजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांच्या भाजपमधील पक्ष प्रवेशाला आमदार देवयानी फरांदे आणि त्यांचे समर्थक यांनी कडाडून विरोध केला.भाजप कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्याच कार्यकर्ते यांनी पांडे,खैरे आणि वाघ यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला.
मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न होणार होता.जो पर्यंत मंत्री गिरीश महाजन हे भाजप कार्यालयात दाखल होत नाही तो पर्यंत पोलिसांच्या बंदोबस्तात विरोध करणारे भाजप कार्यकर्ते आणि विनायक पांडे,शाहू खैरे,यतीन वाघ हे एकमेकांसमोर थांबलेले होते.
मात्र दुपारच्या दरम्यान गिरीश महाजन हे जेव्हा भाजप कार्यालयात दाखल झाले तेव्हा पक्ष प्रवेशाला विरोध करणारे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आपला विरोध दर्शवत थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या अंगावर गेल्याच्या दिसून आले.समजूतदारीच्या भूमिकेत असलेल्या गिरीश महाजन यांचा देखील काही वेळाने पारा चढला होता.
संतापलेल्या गिरीश महाजन यांनी बोट दाखवत कदाचित दम भरला असे रूप मंत्री गिरीश महाजन यांचे दिसून आले होते…त्यानंतर मंत्री महाजन यांना कार्यालयाच्या आत नेण्यात आले.यावेळी आमदार राहुल ढिकले,शहराध्यक्ष सुनील केदार माजी आमदार बाळासाहेब सानप आदी प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यामुळे आता आज झालेल्या भाजप कार्यालयातील गोंधळाची सर्व राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहे.येत्या काळात अंगावर आलेल्यांना मंत्री गिरीश महाजन राजकीय खेळीत अडकवितात की,माफ करतात हे पाहणे महत्वाचे असेल…
