भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद? नवीन वर्षात भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर….
1 min read
पुणे दि.२५:- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुम्ही नवीन वर्षात भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
१ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिने भाविकांना मुख्य मंदिरात दर्शन घेता येणार नाही. मंदिर प्रशासनाने विकासकामांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे.नेमकं कारण काय?भीमाशंकर मंदिराचा नवा विकास आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे नूतनीकरण आणि परिसरातील पायाभूत सुविधांचे काम हाती घेतले जाणार आहे.
बांधकामादरम्यान मोठी यंत्रसामग्री आणि साहित्याची वर्दळ असणार आहे. अशा परिस्थितीत भाविकांची सुरक्षितता धोक्यात येऊ नये, यासाठी प्रशासनाने दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
