आंतरशालेय नाट्य स्पर्धेत ‘मानवा झाडं वाढवं रं’ हे वृक्ष संवर्धन नाट्य गाजले
1 min read
नारायणगाव दि.२२:- यशवंतराव चव्हाण आंतर शालेय नाट्य स्पर्धा 2025- 26 अंतर्गत पुणे जिल्हा परिषद आंतरशालेय नाट्य स्पर्धा, रा. प. सबनीस विद्यालय नारायणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आली.या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावातील विद्यार्थ्यांनी
‘मानवा झाडं वाढवं रं’ हे वृक्ष संवर्धन या विषयावर छान असं नाटक सादर केलं. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन या शाळेतील शिक्षक दत्तात्रय बहिरू हाडवळे यांनी केले. नेपथ्य पुष्पा साके व आशा चुकाटे यांनी केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटकातून उत्तम असा अभिनय सादर केला.
या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम शाळेतील मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे सर, शोभा गोंदके, बाळासाहेब राजगुरू, प्रभाकर गुंजाळ, संतोष वाघोले व मंगल आग्रे या सर्व शिक्षकांनी केले. उत्तम असं नाटक विद्यार्थ्यांनी आज स्पर्धेमध्ये सादर केलं.
नाटकाचा विषय होता वृक्ष संवर्धन. वृक्ष संवर्धन केले नाही तर बिबट्या आपल्याला त्रास देणारच. अशा या नाटकाला सर्व प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. केंद्रप्रमुख शंकर सोनवणे यांनी शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
