चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन MH03FB ही मालिका लवकरच सुरू
1 min read
मुंबई दि.१९:- मुंबई (पूर्व) प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहन संवर्गातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन MH03FB ही मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सध्या वापरात असलेली MH03ES मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका २२ डिसेंबर २०२५ पासून लागू होणार आहे.
या नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र,
पॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित फी राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह Regional Transport Office, Mumbai (East) किंवा RTO, Mumbai (East)
यांच्या नावे काढून २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व), २ रा व ३ रा मजला, बी-२ इमारत, वडाळा ट्रक टर्मिनल, वडाळा, मुंबई ४०० ०३७ (इमेल : rto.03-mh@gov.in; दूरध्वनी क्र. ०२२-२४०३६२२१) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
