मंत्री भरत गोगावले यांनी फळबाग व नर्सरींना भेट देऊन केली पाहणी

1 min read

नागपूर दि.१९:-रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खार भूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी काल काटोल आणि कळमेश्वर तालुक्यातील विविध प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबाग व नर्सरींना भेट देऊन पाहणी केली. कळमेश्वर तालुक्यातील कोहळी, काटोल तालुक्यातील हातला येथील प्रगतीशील शेतकऱ्यांच्या फळबागांची पाहणी करीत माहिती जाणून घेतली.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, फलोत्पादन विभागाचे संचालक अंकुश माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.देवानंद पंचभाई, वंडली येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र प्रमुख डॉ.मेघा डहाळे, कृषी महाविद्यालयाचे विभागीय प्रमुख डॉ. विनोद राऊत तसेच मनोज जवंजाळ यांच्यासह फलोत्पादन व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!