श्री रंगदासस्वामी शाळेच्या विद्यार्थांचा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत डंका

1 min read

बेल्हे दि.१८:- विलास वाघ मेमोरियल फाउंडेशन पुणे आयोजित समता शिक्षण संस्था पुणे आनंदाश्रम प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर जिल्हा पुणे क्रीडा महोत्सव येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत मानाचा तुरा रोवणारे आपल्या श्री रंगदास स्वामी प्राथमिक आश्रम शाळा आणे (ता. जुन्नर) या शाळेने जिंकले एकूण ११ पदके जिंकले.शाळेतील ज्या विध्यार्थ्यानी पदके मिळवली ते पुढील प्रमाणे
गोळा फेक – साईराज गणेश आचार्य 7 वी 11.80 मीटर प्रथम पारितोषिक थाळी फेक- साईराज गणेश आचार्य 7 वी 18.75 मीटर प्रथम पारितोषिक. 50  मीटर धावणे -छोटा गट 3 पल्लवी विकास शिंदे 2 री द्वितीय क्रमांक 100 मीटर धावणे झाकणे दिनेश दिलीप इ. 4 थी तृतीय क्रमांक 100 मिटर धावणे – मोठा गट सूरज संतोष साळुंखे 6 वी तृतीय क्रमांकचमचा लिंबू – छोटा गट पल्लवी विकास शिंदे 2 री, द्वितीय क्रमांक झाकणे दिनेश दिलीप द्वितीय क्रमांक 3 री 4 थी गट मुले उंच उडी – लहान गट विशाल राघू भले 4 थी, द्वितीय क्रमांक 3 मीटर 3 री व 4 थी मुले, उंच उडी मोठा गट मुली, अनुष्का बाबाजी भाईक 7 वी प्रथम क्रमांक उंच उडी 5 वी ते 7 वी गट, उंच उडी मोठा गट मुले मच्छिंद्र शंकर फुलारे 7 वी  द्वितीय क्रमांक 5 वी ते 7 वी गटरिले – 4 बाय 100 मुले मोठा गट, तृतीय क्रमांक विष्णू पिटेकर 7 वी, साईराज आचार्य 7 वी, सूरज साळुंखे 7 वी,
मच्छिंद्र फुलारे 7 वी.या विद्यार्थांनी मैदानी स्पर्धेत मनाचा तुरा रोवला या मुलांना संध्या आहेर, गजेंद्र सांगळे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचे श्री रंगदासस्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष श्रीप्रकाश बोरा उपाध्यक्ष जितेंद्र बोरा व मुख्याध्यापक कैलास जोशी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!