जिवलग मित्राची आठवण म्हणून प्राथमिक शाळेत वृक्ष लागवड

1 min read

बेल्हे दि.१६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा (ता.जुन्नर) या शाळेमध्ये कै.अशोक भाऊ गुंजाळ (राम कृष्ण हरी डेअरी फार्म रानमळा) यांचे काही दिवसांपूर्वी अचानक निधन झाले. त्यांची एक आठवण म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा येथे दूध व्यवसायामध्ये एकत्र असणारे व सतत प्रत्येक सुख दुःखामध्ये भावांप्रमाणे राहणारे मित्र दादाभाऊ भगवंता गुंजाळ व सिताराम सबाजी गुंजाळ यांनी जि. प.शाळेच्या कमानी शेजारी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष,पालक मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीमध्ये दोन जिवलग मित्रांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले व सर्वांनी जि प मराठी शाळा वाचवण्याच्या दृष्टीने भविष्यात शाळेला लागणारे बहुतेक सुविधांसाठी “माझी शाळा माझा अभिमान” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!