जुन्नर तालुकास्तरीय स्पर्धेत आळे क्र.३ शाळेचे उल्लेखनीय यश
1 min read
आळे दि.१३:- यशवंतराव चव्हाण कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धा शिवनेरी स्कूल खानापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळे (ता.जुन्नर) क्र.३ ने खो खो या सांघिक क्रीडा प्रकारात (लहान गट) प्रथम क्रमांक मिळवला. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात
१) *शुभम कमलेश यादव* -लांब उडी व ५० मीटर धावणे लहान गट – प्रथम क्रमांक २) *सत्यम हरेंद्र चौहान* -बेडूक उडी लहान गट- प्रथम क्रमांक ३) *सलोनी कमलेश यादव* – लांब उडी- तृतीय क्रमांक या सर्व यशस्वी संघांचे व विद्यार्थ्यांचे आळे ग्रामपंचायतचे सरपंच तथा अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम हनुमंत भंडलकर,
उपाध्यक्ष विशाल भंडलकर व शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व मुख्याध्यापिका संगीता काकडे यांनी अभिनंदन केले.तसेच मंगेश देवगिरे, सुभाष घाडगे, बाजीराव घुंगरराव, रत्नप्रभा जाधव, मंदाकिनी गंभीरे, वर्षाराणी मटाले, सपना माताडे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
