नाशिकमधील आदिवासी क्लस्टरच्या धर्तीवर राज्यात आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना देणार प्रशिक्षण
1 min read
नागपूर दि.१३:- नाशिकमधील आदिवासी क्लस्टरच्या धर्तीवर राज्यात आदिवासी समाजातील तरुण-तरुणींना प्रशिक्षण देणारी प्लग अँड प्ले ही योजना हाती घेण्यासाठी सकारात्मक विचार केला जाईल. यासाठी आवश्यक ती पायाभूत सुविधा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत (एमआयडीसी) उभारली जाईल, असे उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांनी सांगितले.
पोभुर्णा आणि करंजी (ता. गोंड पिंपरी, जि. चंद्रपूर) येथे एमआयडीसी क्षेत्रात आदिवासी औद्योगिक क्षेत्र विकास करण्यासंदर्भात अर्धा तास चर्चेत मंत्री डॉ. सामंत बोलत होते.संबंधित एमआयडीसी प्रकल्पातील १९० हेक्टर जमीन अधिग्रहणाचा निर्णय विरोधामुळे बदलून सध्या २२.३५ हेक्टर जमीन ताब्यात असून ती क्षमता ७३ हेक्टरपर्यंत वाढणार आहे:- मंत्री डॉ. उदय सामंत
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी ३०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून लवकरच या योजनेचा १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, चंद्रपूरसह इतर जिल्ह्यांतील प्रलंबित प्रस्तावांसाठी आवश्यक असलेला १०० टक्के निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल, असे इतर मागास, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यासाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या माध्यमातून ८८ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असून, तोही संपूर्णपणे वितरित केला जाईल. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून प्रामुख्याने प्रधानमंत्री आवास योजनेखाली नवी घरकुले देण्यात येत असून, सर्व प्रलंबित घरकुल हप्त्यांचे अनुदान तातडीने वितरित केले जाईल.
योजनेसाठी आवश्यक जमीन महसूल विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या समन्वयातून उपलब्ध केली जाते. संबंधित प्रस्तावांची पडताळणी करून येणाऱ्या सर्व मंजूर प्रस्तावांना शासन पूर्ण मान्यता देईल:- मंत्री अतुल सावे
