तोतया उमेदवारांना अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अटक
1 min read
पुणे दि.१२:- बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) च्या चालक पदाच्या लेखी परीक्षेत दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया उमेदवारांना अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली आहे. कागदपत्रांची बारकाईने तपासणी करताना लेफ्टनंट कर्नल यांनी संशय घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.
नवनीत गोपाल प्राण नाथ सिंह (रा. फतेहपूर, मुजफ्फरपूर, बिहार) आणि अजय दिलबाग सिंग (वय २४, रा. जिंद, हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
धानोरी रोडवरील भैरवनगर येथील ग्रेफ सेंटरमध्ये १ डिसेंबरपासून चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. देशभरातून सुमारे १२०० उमेदवार लेखी परीक्षेसाठी दाखल झाले होते.५ डिसेंबर रोजी उमेदवारांची ओळखपत्रे तपासताना लेफ्टनंट कर्नल पी. अरविंद यांना नवनीत गोपाल हा उमेदवार यापूर्वीही परीक्षा देऊन गेल्याचा संशय आला.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, १ डिसेंबर रोजी त्याने ‘सचिन कुमार’ या नावाने परीक्षा दिल्याचे स्पष्ट झाले.एकाच उमेदवाराने दोन वेळा परीक्षा दिल्याचे निष्पन्न होताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
