विद्यानिकेतनच्या विद्यार्थांची ‘स्पर्धा परीक्षा टॅलेंट टेस्ट’
1 min read
साकोरी दि.११:- विद्यानिकेतन पी.एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) येथे ‘स्पर्धा परीक्षा टॅलेंट टेस्ट’ हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी व स्पर्धात्मक वातावरणाची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही चाचणी घेण्यात आली होती. या उपक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
विद्यार्थ्यांची तयारी सुयोग्य पद्धतीने व्हावी यासाठी अमित साळवे व इमरान शेख यांनी परीक्षा पूर्व मार्गदर्शन, प्रश्नसंच, अभ्यासक्रम,तसेच वेळ व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण दिले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेबद्दलचे भान, आत्मविश्वास व जिद्द वाढल्याचे दिसून आले.
म्हणाले, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविताना प्राचार्य रमेश शेवाळे “विद्यार्थ्यांनी लहानपणापासून स्पर्धा परीक्षांची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे.या टॅलेंट टेस्टमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता तपासता येते आणि योग्य दिशेने तयारी करता येते. शाळेच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी असे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात.”
संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी याप्रसंगी विद्यार्थाना उद्देशून सांगितले की, “विद्यानिकेतन ही संस्था विद्यार्थीकेंद्रित उपक्रमासाठी ओळखली जाते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच करिअरकेंद्रित उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. टॅलेंट टेस्टसारखे उपक्रम विदयार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांकडे आकर्षित करतात.”
या उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह दखलपात्र होता. विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, साकोरी हे उत्तम शैक्षणिक वातावरण, शिस्त व करिअर केंद्रित मार्गदर्शनासाठी एक विश्वासार्ह केंद्र म्हणून पुढे येत आहे.
