आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रम
1 min read
मुंबई दि.१०:- राज्यात मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असलेल्या’ महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण’ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बुधवारी १० डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ‘ही राज्यातील मानवी हक्कांबाबत कायदेशीर कारवाई करणारी संस्था आहे.१० डिसेंबर १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ‘मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा’ (यूडीएचआर) स्वीकारला होता. म्हणूनच १० डिसेंबर हा दिवस मानवी हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा होतो.
कैद्यांना त्यांच्या कारावासातील कालावधीत त्यांचे जीवन, समता, सन्मान आणि स्वातंत्र्याबद्दलचे कायदेशीर अधिकार कळावेत, याकरिता हा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून होणाऱ्या
या कार्यक्रमात राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, कारागृह प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
