नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावा:-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

1 min read

मुंबई दि.८:- राज्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त सोळा आदिवासी जिल्ह्यांमध्ये कार्यरत मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवासमावेशाचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत.नवसंजीवनी योजनेअंतर्गत सन 1995 पासून आदिवासी बहुल भागात मानसेवी वैद्यकीय अधिकारी सेवा बजावत आहेत. या डॉक्टरांचा वैद्यकीय अधिकारी गट-ब मधील रिक्त पदांवर समावेश करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. मानसेवी डॉक्टर संघटना व लोकप्रतिनिधी यांचीही याबाबत सातत्याने मागणी होत होती. याच अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी सेवासमावेशक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.सार्वजनिक आरोग्य विभागात वैद्यकीय आरोग्य सेवा गट-ब (BAMS) ही पदे असून, दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांना रिक्तपदी सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी निर्देश दिले.या बैठकीला आरोग्य सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन,आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, संचालक आरोग्य सेवा डॉ.नितीन अंबाडेकर तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!