परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रम साहित्य वितरण कार्यक्रम

1 min read

पुणे दि.८:- पुणे जिल्हा परिषद, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल व फॉरेन लँग्वेज ऑनलाइन एप्लीकेशन (FLOA) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील परदेशी भाषांचे शिक्षक व मुख्याध्यापक यांना परदेशी भाषा शिक्षण अभ्यासक्रम साहित्य वितरण करण्यात आले.यावेळी FLOA चे संस्थापक शैलेश लेले, जर्मन भाषा तज्ञ मनाली राजे, फ्रेंच भाषा तज्ञ तृप्ती रेखी, माहिती व तंत्रज्ञान तज्ञ दिलीप कलंत्री, कौस्तुभ देशपांडे यांनी उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांना या शिक्षण साहित्याच्या वापराबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जर्मन भाषा तज्ञ डॉ. सविता केळकर, डॉ. क्रिस्तियान कॉस, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, सिद्धार्थ चव्हाण, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलच्या अध्यक्ष लेखा नायर, रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रलचे सीएसआर संचालक रवी कपूर त्यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!