सूर्या करिअर अकॅडमीचे संचालक श्रीकांत मुरलीधर मदने यांना मातृशोक

1 min read

आळेफाटा दि.७:- वडगाव आनंद (ता.जुन्नर) येथील सूर्या करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मुरलीधर मदने यांच्या मातोश्री कै. संगीता मुरलीधर मदने (वय ५७) यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्या अत्यंत मायाळू व धार्मिक वृत्तीच्या होत. त्यांच्या पश्चात पती मुरलीधर मदने, मुलगा श्रीकांत मदने, मुली स्मिता गणेश जाधव व सुजाता योगेश पगारे, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधी राजकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या आकस्मित जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दि.१५ डिसेंबर २०२५ रोजी साडेसात वाजता वैकुंठधाम वडगाव आनंद येथे होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!