दत्तनगर येथे भक्त पंढरी मोठ्या भक्तीभावाने साजरी
1 min read
बेल्हे दि.७:- बेल्हे व परिसरात दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. दत्तनगर दत्त सेवा मंडळाने द्वितीय तपपुर्ती व भक्त पंढरी मोठ्या भक्तीभावाने साजरी केली. आठ दिवस काकडा, भजन, हरिपाठ, गुरुचरित्र पारायन तसेच आठ दिवस ७ ते ९ प्रसिध्द किर्तन कारांची कीर्तन सेवा झाली.
दत्त जन्माच्या दिवशी दत्त नगर ते बेल्हे अशी दिंडी काढन्यात आली. गावात शिवाजी डुंबरे यांनी दिंडिचे स्वागत केले. दिंडी भाविक भक्तांना फराळाचे व केळी दुधाचे वाटप करन्यात आले. नंतर दिंडी ग्राम प्रदक्षिणा करून पुन्हा दत्त नगर ला आली.
नंतर चार ते सहा दत्त जन्माचे किर्तन झाले.महाप्रसाद वाटप झाले. दुसऱ्यादिवशी काल्याच्या किर्तनाने दत्त जयंती सप्ताहाची सांगता झाली. उत्सव यशस्वी करन्यात बबनराव पिंगट, बबुशा पिंगट, तान्हाजी औटी, कैलास पाटील, राहुल पाटील यांचे सहकार्य लाभले.
