गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण संपन्न

1 min read

मुंबई दि.६:- सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा, गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण रविंद्र नाट्यमंदिर येथे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे वेगळे ठरले आहेत अशा ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाख रुपयांचे अर्थसहाय्य देऊन आपण सन्मानित करत आहोत. नाविन्यपूर्ण तंत्राचा वापर करुन प्रेक्षकांच्या जाणीव जागृतीला हातभार व मनोरंजन करणाऱ्या मराठी चित्रपटांना शासन नेहमीच प्रोत्साहन देत आले असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर,चित्रपट सृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, यासह पुरस्कार विजेते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!