मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत “कॉफी विथ कमिशनर अँड सीईओ” उपक्रम
1 min read
पुणे दि.६:- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, हिवरे बाजार गावचे आदर्श सरपंच पोपटराव पवार, यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी व पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे “कॉफी विथ कमिशनर अँड सीईओ” हा उपक्रम संपन्न झाला.
या उपक्रमाच्या माध्यमातून महिला सशक्तिकरण, घनकचरा व्यवस्थापन, लोकसहभागातून ग्रामविकास या क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकांनी आपले अनुभव मांडले. गावाचा विकास करताना शाळांकडे विशेष लक्ष द्यावे, आजचे विद्यार्थी हेच उद्याच्या सशक्त भारताचे नागरिक आहेत
ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अधोरेखित केले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोपटराव पवार, मल्लिनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.
