“हजारो झाडांवर कुऱ्हाड…”, रोहित पवार आक्रमक

1 min read

नाशिक दि.५:- कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्यांवरून आता रोहित पवार हे देखील आक्रमक झाले आहेत. याबाबत रोहित पवार म्हणाले की

, “लोक राजकीय कारणासाठी पर्यावरणवादी झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान हे समस्त पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचा अवमान करणारं आणि त्यांची खिल्ली उडवणारं आहे. एकीकडं ठेकेदारांचं बिऱ्हाड जगवण्यासाठी हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवण्याची चूक करायची आणि त्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अवमान करायचा हे सरकारला शोभत नाही. दुसऱ्या बाजूला राजकीय पर्यावरणाचा विचार न करता तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात अजित पवार यांनी घेतलेली भूमिका ही निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यांच्या या भुमिकेमुळं तपोवनातील वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना नक्कीच बळ मिळेल.”

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!