मुरूम तस्करांचा महिला मंडळाधिकाऱ्यांशी धुडगूस

1 min read

नेवासे दि.२:- अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा पंचनामा बदलुन द्या,आम्ही निर्दोष असल्याचा पंचनामा करुन द्या यासाठी मुरूम तस्करांच्या गँगने कुकाणे येथील भरचौकात महिला मंडळाधिकारी यांच्या वाहनाला वाहन आडवे लावून अश्लीश शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देत प्रचंड दहशत माजवली याप्रकरणी नेवासे पोलिसांत सहा जणांना विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नेवासे तालुक्यातील भेंडे शिवारात गट नंबर २६५/३ मध्ये अवैध गौण खनिज उत्खनन होत असल्याच्या तक्रारीवरून वारिष्ठांच्या आदेशाने कुकाणे मंडळाधिकारी तृप्ती साळवे यांनी तत्कालीन तलाठी बद्रीनाथ कमानदार, कोतवाल सुभाष महाशिकारे यांच्यासमवेत २४ एप्रिल २०२५ रोजी संबंधित ठिकाणी पाहणी केली असता तेथे जेसीबी, डंपर व इतर साधनाने मुरूम उत्खनन झालेले व होत असलेले आढळून आले. दरम्यान, मंडळाधिकारी साळवे व त्यांच्या पथकाने कारवाई करत पोलिसांच्या मदतीने संबंधित वाहने व साधने ताब्यात घेत उत्खनन झालेल्या जागेचा पंचनामा करत कारवाई केली होती.या पार्श्वभूमीवर संबंधित बुधवार (दि.२६) रोजी सकाळी मंडलाधिकारी साळवे या आपल्या चारचाकी वाहनातून तलाठी आहेरे यांच्या समवेत वडुले (ता.नेवासे) येथे अतिवृष्टी खरड जमीन पंचनामे करण्यासाठी जात असताना कुकाणे येथील देडगाव चौकात मुरूम तस्कर अक्षय बाबासाहेब बोरसे,श्रीराम बाबासाहेब बोरसे (दोघे रा. सुकाळी बुद्रुक) व चंद्रकांत पाडळे (रा. चिलेखनवाडी, ता. नेवासे) यांच्यासह इतर ३-४ जणांनी मंडलाधिकारी साळवे यांच्या वाहनाला मुरुमतस्करांनी त्यांचे वाहन आडवे लावून शिवीगाळ करत गोंधळ घालत माझ्या अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनांवर केलेल्या कारवाईचा पंचनामा बदलुन द्या,आम्ही निर्दोष असल्याचा (आम्ही गौण खनिज उत्खनन केले नाही) असा पंचनामा करुन द्या असे तो लोक ओरडून म्हणत तुम्हाला नोकरी करून देणार नाही अशी धमकी दिली.या प्रकरणी मंडलाधिकारी साळवे यांच्या फिर्यादीवरून नेवासे पोलिसांत अक्षय बाबासाहेब बोरसे, श्रीराम बाबासाहेब बोरसे (दोघे रा. सुकाळी बुद्रुक) व चंद्रकांत पाडळे (रा. चिलेखनवाडी, ता. नेवासे) यांच्यासह इतर ३-४ जणांवर सरकारी कामात अडथळा सह आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.आरोपी मोकाटचं.. एवढा मोठा गुन्हा घडून व गुन्हा दाखल होऊन तीन दिवस झाले तरीही यातील अक्षय बाबासाहेब बोरसे, श्रीराम बाबासाहेब बोरसे, चंद्रकांत पाडळे यांच्यासह इतर ३-४ आरोपी अद्यापही अटक करण्यात आलेली असल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत चालले आहे. पोलिसांनी यातील आरोपींना तातडीने अटक करावी अशी मागणी होत आहे. —————
तक्रदाराची बनावट सही
याप्रकरणी अॅड.स्वप्नील गरड यांनी भेंडे येथे होत असलेले अवैध गौण खनिज उत्खननची तक्रार केली होते. त्याची दाखल घेत मुरूम तस्कर बोरसे बंधूं व त्यांच्या वाहनांवर २४ एप्रिल २०२५ रोजी कारवाई झाली होती. दरम्यान, बुधवारी (दि.२६) रोजी मंडलाधिकारी यांच्यावर हल्ला झाला त्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल होताच गुरुवारी (दि.२७) रोजी अॅड.स्वप्नील गरड यांच्या सहीनीशी जिल्हाधिकारी यांना मी ही तक्रार मागे घेत आहे असा अर्ज करण्यात आला. या विषयी अॅड. स्वप्नील गरड यांना विचारले असता त्यांनी बनावट सही करून हा अर्ज केला असल्याचे म्हणत त्यांनी याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!