निमगाव सावात बिबट्या जेरबंद; महिन्यात ३ बिबटे जेरबंद

1 min read

निमगाव सावा दि.३०:- निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील शेकेमळा थोरातमळा या ठिकाणी रविवार दि.३० पहाटेच्या वेळी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. एका महिन्यात ३ बिबटे एकाच मळ्यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याचा वावर या दोन्ही मळ्यामध्ये बिबट्याचा वावर बऱ्याच दिवसापासून होता. त्यामध्ये वन विभागाने पिंजरा लावल्यामुळे तीन बिबटे जेरबंद करण्यामध्ये ग्रामस्थांच्या माध्यमातून यश आले आहे. अजूनही त्या परिसरात बिबटे असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे. या परिसरात पिंजरा पुन्हा एकदा लावावेत अशी मागणी ग्रामस्थांन कडून करण्यात येत आहे. किरण गोत्राळ, गणेश गाडगे, निलेश गाडगे, सुनील गहिणे, अजित गाडगे यांनी या परिसरामध्ये जनजागृती केली होती. त्यामुळे ग्रामस्थ सतर्क राहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!