जुन्नरचा विकास बारामती, पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर करू:- अजित पवार

1 min read

जुन्नर दि.२९:- ऐतिहासिक जुन्नर शहरात केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच जिल्हा वार्षिक योजना, सी. एस. आर. फंडातून विविध विकास कामांच्या योजना राबविणार असून आगामी काळात शहरात भुयारी वीज वाहक तारा, एसटीपी प्लांट, विसर्जन मिरवणूक सिमेंट मार्ग आदी विकास कामे केली जाणार आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा विनियोग नियमानुसार होऊन विकासकामे दर्जेदार पद्धतीनेच झाली पाहिजेत, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी जुन्नर येथे व्यक्त केले. अजित पवार पुढे म्हणाले, नगरपरिषद निवडणुका गेल्या नऊ वर्षापासून रखडलेल्या होत्या. आता होणाऱ्या या निवडणुकीमध्ये शहराची सूत्रे कोणाच्या हातात द्यायची याचा निर्णय मतदारांनी घ्यायचा असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आहे. गेल्या चार वर्षात जुन्नर मध्ये सुमारे ११६ कोटीची विकास कामे झालेली आहेत. तसेच प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे इमारतीची कामे प्रगतीपथावर आहेत. जुन्नर मध्ये पर्यटन आला महत्त्व देणारा असून विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत बारामती तसेच पिंपरी चिंचवड प्रमाणे जुन्नर चा विकास करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.या सभेप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,माजी खासदार शिवाजी पाटील, माजी आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षक उज्वला शेवाळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, शहराध्यक्ष धनराज खोत जिल्हा बँकेच्या संचालिका पूजा बुट्टे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गणपत फुलवडे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!