राजुरीच्या केळी इराकला मिळतोय चांगला बाजारभाव
1 min read
राजुरी दि.२३:-पिंपळगाव जोगा कालवा जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातुन गेल्याने या भागातील ऊस,केळी ,द्राक्षे बागायती पिके घेऊ लागला आहेत.राजुरी येथील विक्रांत महेंद्र हाडवळे या तरूणाचे शिक्षण बी एस सी ॲग्री पर्यंत असताना देखील नोकरीच्या मागे न लागता वडीलोपार्जित असलेली शेती करण्याचे काम करत आहे.
त्यानुसार सुरवातीला सोयाबिन,मुग,उडीद,बाजरी हि पिक घ्यायचे .परंतु या पिकांमधुन त्यांणा चांगला फायदा काय होतं नव्हता त्यानंतर कोणते पिक घेतल्यानंतर आपल्याला किती फायदा होईल याचा अभ्यास केल्यानंतर एक एकर दहा गुठे क्षेत्रामध्ये केळीचे पिक घेण्याचे ठरवले.
यासाठी सुरवातीला भाजीचे पीक निघल्यानंतर त्यामध्ये दोन ट्राॅली शेणखत पांगुन नागरले एक महिनाभर ते शेत तापवुन दिले.त्यानंतर नांगरलेले शेत रोटरून त्यामध्ये पाच बाय आठ फुटाच्या अंतरावर सरी काढली व याच फुटाच्या अंतरावर जळगाव या ठिकाणाहून आणलेली जैन ची सुमारे १ हजार ३०० रोपे आणुन अर्धा फुट खोल खड्डा घेऊन लावली.
औटी यांणी या केळीच्या बागेला ठिबक सिंचन चा वापर केला.तसेच झाडे वादळाने तसेच फळांच्या वजणाने झाड पडु नये यासाठी प्रत्येक झाडाला बांबूचा आधार दिला. वेळोवेळी औषधी फवारणी पाणी दिल्याने ४० टन माल निघाला आहे. हाडवळे यांना यासाठी १ लाख ५० हजार रूपयांचा खर्च आला आहे.
सध्या लोकल मार्केटला एका किलोला फक्त ८ ते १० रुपये बाजारभाव चालु असताना त्यांनी आपल्या शेतात निघालेला माल परदेशात पाठवण्याचे ठरवले.स्वता उच्चशिक्षित असल्याने ऑनलाईन व्यापा-यांची माहिती मिळवत त्यांच्याशी संपर्क केला असता व्यापा-यांनी शेतावर येऊन केळीची पाहणी केली
व माल चांगला असल्याने २१ रूपये किलो प्रमाणे खरेदी केला आहे. या मधुन त्यांना खर्च वजा जाता पाच ते सहा लाख रूपयांचा नफा मिळाला आहे.या वेळी विक्रांत हाडवळे बोलताना म्हणाले की, केळी असे पिक आहे या पिकाला जमीन ही काळी लागते तसेच पाणी जास्त प्रमाणात द्यावे लागते.
परंतु संपुर्ण बागेला ठिबक सिंचन चा वापर केल्याने पाण्याची बचत झाली तर रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केल्याने एका घडाचे वजन जवळपास ३० ते ३५ किलो भरुन ते खायला देखील चविष्ट लागत असल्याने
व्यापाऱ्यांनी जागेवरच येऊन माल केळी खरेदी केलेली असुन २१ रूपये किलो प्रमाणे संपुर्ण माल हा इराक देशांमध्ये विक्री साठी जाणार आहे.तसेच शेतीच्या कामात आईवडीलांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असल्याचे आहे.
