फौजदारी कायद्यांवर आधारित आझाद मैदान प्रदर्शनाचे आयोजन
1 min read
मुंबई दि.२२:- भारतीय न्यायसंहिता,भारतीय नागरिकसुरक्षा संहिता व भारतीय पुरावाकायदा या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन आझाद मैदान येथे करण्यात आले आहे.या प्रदर्शनामध्ये २५ मिनिटे कालावधीच्या नाट्यातून प्रात्यक्षिकाद्वारे नवीन कायदे विस्तृतपणे समजावून सांगण्यात आले आहे.
या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे प्रदर्शन रविवार २३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान खुले राहणार आहे.प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या नवीन फौजदारी कायद्याविषयी माहिती करून घ्यावी.
विशेषत्वाने विद्यार्थी, विधिज्ञ, विधि शाखेचे विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी यांनी भेट द्यावी, असे आवाहन गृह विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
