बोंबे कुटुंबियांच्या घरी वळसे पाटील व आढळराव पाटील यांची भेट
1 min read
शिरूर दि.८:- बिबट्याच्या सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला गमवावा लागला आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील शिवण्या शैलेश बोंबे या लहान मुलीचा आणि काही दिवसांपूर्वी रोहन बोंबे या तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटना हृदय पिळवून टाकणाऱ्या आहेत.
माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व आंबेगाव-शिरूर विधानसभेचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यासमवेत बोंबे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.
बिबट्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी योग्य शासकीय व प्रशासकीय स्तरावरून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या चिमुकल्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या परिवाराला या कठीण प्रसंगी धैर्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
