बिबट्यांसाठी वनमंत्री गणेश नाईक यांचा हल्ले रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

1 min read

मुंबई दि.५:- शिरुर तालुक्यासह जुन्नर, आंबेगाव, खेड परिसरातील बिबट्यांमुळे मनुष्यहानी होणे ही दुर्देवी घटना असून यावर तातडीच्या उपाययोजना करुन या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी दोनशे पिंजरे तातडीने लावण्यात येणार असून.अजून एक हजार पिंजरे युद्धपातळीवर खरेदी करण्यात येणार असताना सदर परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे तातडीने स्थलांतर करण्यात येईल आणि बिबट्यांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी सॅटेलाईट आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अर्लट देण्यात येईल अशी माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे.शिरुर तालुक्यातील पिंपरखेडच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील शिरुर, जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील बिबट्यांच्या मानवावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रालयात बैठक घेऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्रवक्ते वसंतराव जाधव, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, वनविभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर,प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, पुण्याचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांसह आदी उपस्थित होते तसेच पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल हे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी बोलताना सदर परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी व हल्ल्याच्या घटना घडू नयेत यासाठी दीर्घ व अल्पकालीन उपाययोजना तातडीने राबवत परिसरात वन विभागांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येईल, केंद्र शासनाच्या परवानगीने या परिसरातील बिबट्यांना पकडून त्यांचे स्थलांतर वनतारासह इतर राज्यात किंवा ज्यांना अधिकार आहे अशा ठिकाणी पाठविण्यात येतील,वनाशेजारील शेतीला व गोठ्यांना विद्युत तारांचे कुंपण लावणे, एआयच्या माध्यमातून बिबट्यांची हालचालीची माहिती नागरिकांना कळविणे, शेतीला दिवसा पूर्ण ताकदीने वीज पुरवठा करणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना आज देण्यात आल्या असून या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी जिल्हा नियोजन निधीतून तातडीने दोनशे पिंजरे खरेदी करण्यात येणार असून वन विभागाच्या निधीतून आणखी एक हजार पिंजरे तातडीने खरेदीसाठी दहा कोटींचा निधी देण्याचे निर्देश देण्यात आले असून वन विभागाला लागणारी वाहने, पिंजरे व इतर साहित्य तातडीने पुरविण्याचे व त्यासाठी लागणारा निधी देण्याचे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी यावेळी दिले आहे.बिबट्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असून या प्रस्तावास लवकरात लवकर मान्यता मिळण्यासाठी सर्वपक्षीय नेते व वन अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय वन मंत्री यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचे देखील वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. स्वतंत्र चौकट २ –
शिरुर तालुक्यात गेल्या काही दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्देवी असून कालच्या घटनेनंतर वन विभागाकडून तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले असताना या बिबट्याचे तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच या घटनास्थळी भेट देऊन लोकप्रतिनीधीं बरोबर चर्चा करण्यात येईल असे देखील वन मंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.फोटो खालील ओळ – शिरुर तालुक्यातील बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात मंत्रालयात घेण्यात आलेली बैठक.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!