बिबट्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक
1 min read
मंचर दि.४:- बिबट्या – मानव वाढता संघर्ष रोखण्यासाठी आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यासाठी शाश्वत उपाय करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज (दि. ४) सकाळी १०:३० वा. मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
वनमंत्री गणेश नाईक यांना पत्र लिहून या विषयाचे गांभीर्य मांडले आहे.काल त्यांच्याशी बोलल्यानंतर मंत्रालय येथे आज सकाळी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात पाठपुरावा केला असून, केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेला बिबट्या नसबंदीच्या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात पिटीशन दाखल केली, जेणेकरून न्यायालय केंद्र सरकारला या कायद्याच्या अंमलबजावणीचे ठोस निर्देश देईल. वनविभागाकडून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याचा लेखी आदेश जारी झाला आहे.
२०० पिंजरे उपलब्ध करून देण्यासाठी २.२३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा वीज उपलब्ध होणार असून, अतिसंवेदनशील गावांत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानित सौर कुंपण देण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
शिरूर येथे २०० बिबट्यांसाठी नवीन रेस्क्यू सेंटर सुरू करण्याबाबतचा निर्णय प्रगतिपथावर आहे. बिबट प्रवण क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आणखी ५० युनिट्स वापरण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
