शिरूरमध्ये ‘रन फॉर युनिटी’ अंतर्गत राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार
1 min read
शिरूर दि.३१:- शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता ‘रन फॉर युनिटी’ अंतर्गत राष्ट्रीय एकता दौड चे भव्य आयोजन करण्यात आले. लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या दौडीस स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या एकता दौडीत शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, ६ पोलीस अधिकारी, ४० पोलीस अंमलदार तसेच सीताबाई थिटे कॉलेज आणि श्रीनाथ ॲकॅडमी येथील विद्यार्थ्यांसह नागरिक मिळून सुमारे १९० ते २०० सहभागी झाले होते.
दौड सीताबाई थिटे कॉलेज येथून सुरू होऊन
बाबुराव नगर ब्रिज सिटी बोरा कॉलेज निर्माण प्लाझा चौक इंदिरा गांधी पुतळा चौक बीजे कॉर्नर कोर्ट चौक मार्गे परत सीताबाई थिटे कॉलेज येथे संपली. सुमारे तीन किलोमीटर अंतराच्या या दौडीदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’, ‘राष्ट्रीय एकता जिंदाबाद’ अशा घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारून गेले होते.
दौड पूर्ण झाल्यानंतर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास शिरूर पोलीस ठाण्याचे अधिकारी, शिक्षकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
या निमित्ताने राष्ट्रीय एकतेचा संदेश देत सर्व सहभागीनी देशातील एकता, अखंडता व बंधुभाव टिकवण्याचा संकल्प केला. शिरूर पोलिसांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
