राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंदिरा गांधी पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल जयंती साजरी

1 min read

कर्जुले हर्या दि.३१:-राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, कर्जुले हर्या (ता.पारनेर) येथे भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुलकुमार हिंगोले आणि डॉ.कृपाल पवार उपप्राचार्य यांनी या प्रसंगी मार्गदर्शन करताना इंदिरा गांधी यांच्या दृढ नेतृत्वाचे आणि सरदार पटेल यांच्या एकीच्या कार्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यांनी सांगितले की, “या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांनी भारताच्या विकासात आणि एकात्मतेत मोलाचा वाटा उचलला असून, त्यांच्या कार्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी.”या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव किरण लक्ष्मण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.दीपक लक्ष्मण आहेर, आणि संस्थेचे खजिनदार बाळासाहेब उंडे,शिक्षकवृंद,विभाग प्रमुख प्रा.प्रवीण औटी, प्रा.प्रवीण दराडे, प्रा.संदीप गात, प्रा.सतीश गुंजाळ, प्रा. राहिंज पल्लवी, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे आणि विचार सादर करून कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक समितीच्या सहयोगाने करण्यात आले. शेवटी सर्वांनी राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!