उदासीन शासकीय यंत्रणेमुळे नळवणे गावातील शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित:- संतोष शिंदे

1 min read

आणे दि.३१:- मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून हेक्टरी १७ हजार रुपये शासकीय मदत देण्याचे जाहीर केले होते. परंतु उदासीन शासकीय यंत्रणेने आमच्या नळवणे गावातील फक्त १७ शेतकऱ्यांचे पंचनामे केले व गावातील शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. शेजारील अणे, पेमदरा, शिंदेवाडी या गावातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना काही हजारात शासकीय मदत मिळालेली असताना. आमच्या गावातील फक्त १७ लोकांना नुकसान भरपाई मिळाली. याला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत, महसूल, आणि कृषी खाते आहे. असे नळवणे गावचे नुकसानग्रस्त शेतकरी संतोष शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.———-
प्रतिक्रिया

‘नळवणे परिसरात पावसाच प्रमाण कमी होते. तीन दिवसांत वापसा झाला. तसेच गावात शिवार फेरी करून चौकशी केली असता बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन काढुन घेतलं आहे, असं सांगण्यात आले. मोलदरा भागात काही ठिकाणी सोयाबीन पाण्यात होते. ज्याचे नुकसान झाले होते त्याची प्रत्यक्ष पाहणी करून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी , सहायक कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे पंचनामे केले.

श्याम सलामे
ग्राम महसूल अधिकारी
——–

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!