२७ वर्षांनी विकास विद्यालय, नांदूर पठार चे माजी विद्यार्थी १९९७-९८ बॅचचा स्नेह संमेलन सोहळा आनंदात साजरा
1 min read
आळेफाटा दि.३०: – आळेफाटा येथील ज्ञानेश्वरी हॉटेलमध्ये स्नेहसंमेलन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी विकास विद्यालय, नांदूर पठार १९९७-९८ वर्षीचे दहावीचे सर्व विद्यार्थी व शाळेचे शिक्षक आग्रे सर व शंकर घनदाट उपस्थित होते. प्रथमतः गुरुवर्यांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत करून
सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला व विद्यालयाचे शिक्षक आग्रे सर व शंकर घनदाट यांनी मार्गदर्शन केले व सर्वांना खळखळून हसवून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करून आपल्या आजवरच्या यशाचे गमक सांगितले.
बाळासाहेब आग्रे,शरद घोलप व शिवाजी आग्रे यांनी मित्र कसा असावा, जीवनातील चढ-उतार, जीवन कसे जगावे इ.विषयी महत्व पटवून दिले. तसेच श्रीदेवी पवार व मंगल राजदेव यांनी आपल्या मधुर वाणीने प्रार्थना व अभंग म्हणून दाखविला. व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाला शरद घोलप, सुरेश देशमाने, बाळासाहेब आग्रे, हिरा झावरे,शबिना हवालदार, रुबिना हावलदार, मंगल राजदेव, सुनिता चिकणे, सविता घुले, कविता घनदाट, प्रमिला चिकणे, संगिता आग्रे, शिवाजी आग्रे, दिपक राजदेव, सुनिल घनदाट, भाऊसाहेब माने, निवृत्ती आग्रे, संतोष नवले, बारकू चिकणे,
बाबाजी घोलप, किरण पानसरे, श्रीदेवी पवार, यांनी सुद्धा आपल्या शाळेतील छोट्या-मोठ्या गमती जमती सांगून सर्वांना खळखळून हसवले. कार्यक्रमात सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.सदर कार्यक्रम सर्वांच्या कल्पनेने व सहकार्याने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले.
सर्वांना असा कार्यक्रम नेहमीच घेण्यात यावा, असे वाटायला लागले. सर्वजण कार्यक्रमामुळे आनंदीत व उत्साहीत दिसत होते.शेवटी अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीदेवी पवार व बाळासाहेब आग्रे यांनी केले. हिरा झावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
