शिरुर तालुक्यात शेती अवजारे चोरीला

1 min read

न्हावरे दि.३०:- शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील निर्वी गावात अज्ञात चोरट्याने शेतातुन तब्बल ८५ हजार किमतीची शेती मशागतीची अवजारे चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत दिनेश गुलाब टिंगरे (वय ३५, रा. विश्रांतवाडी, धानोरी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दाखल केली असुन त्यांच्या निर्वी येथील गट क्र ५९४ मधील शेतातील घरातुन दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १० ते २९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ च्या दरम्यान हि चोरीची घटना घडली आहे.यावेळी चोरट्यानी हायड डबल रिव्हर्सीबल प्लग (४५ एचपी कंपनीचा नांगर, किंमत अंदाजे ६०हजार) आणि काकया सीड डील मॅन्युअल (९ टाइन कंपनीचे अवजार, किंमत अंदाजे २५ हजार) अशी एकूण ८५ हजार रुपयांची शेती मशागतीची अवजारे लंपास केली आहेत. या प्रकरणी शिरुर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असुन तपास पोलिस हवालदार विनोद मोरे हे करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!