कोळवाडीच्या सरपंच पदी ललिता पारवे यांची निवड

1 min read

आळेफाट दि.२९:- कोळवाडी (ता. जुन्नर) च्या सरपंच पदी ललिता प्रवीण पारवे यांची बुधवार दि.२९ रोजी निवड झाली. सरपंच अतीशा कुऱ्हाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी ललिता प्रवीण पारवे व कल्पना रामदास गाढवे या दोघींचे अर्ज आले होते. कोणीही माघार न घेतल्यामुळे मतदान घेण्यात आले.९ पैकी ललिता पारवे यांना ६ मते मिळाली तर कल्पना गाढवे यांना ३ मते मिळाली. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी दादाभाऊ काळे यांनी काम पाहिले.तर सहाय्यक अधिकारी म्हणून गावच्या ग्रामसेवक पुनम चव्हाण, तलाठी विशाल मुंगळे यांनी काम पाहिले. अशी माहिती गावचे उपसरपंच विशाल कुऱ्हाडे यांनी दिली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने निर्वाचित सरपंच ललिता पारवे यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!