पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी काळजीपूर्वक अर्ज भरावा:- श्रीकांत मदने
1 min read
आळेफाटा दि.२९:- पोलीस भरतीसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास आज २९ ऑक्टोबर पासून सुरुवात होत असून उमेदवारांनी काळजीपूर्वक व विचारपूर्वक अर्ज भरण्याचे आवाहन सूर्या करिअर अकॅडमी चे संचालक श्रीकांत मदने यांनी केले आहे.
पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, कारागृह पोलीस, सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज भरावा तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना काळजीपूर्वक, जागांचा विचारकरुन ऑनलाईन अर्ज भरावा.
आज पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. उमेदवारांनी शारीरिक व लेखी परीक्षेची चांगली तयारी करावी. आळेफाटा येथील सुर्या करिअर अकॅडमी मध्ये उमेदवारांची सर्व तयारी करून घेतली जाते. सुर्या अकॅडमीच्या विद्यार्थांचे शासकीय सेवेत भरती होण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के आहे.
स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांनी अचूक मार्गदर्शनासाठी अकॅडमी मध्येच सराव करावा असे आवाहन श्रीकांत मदने यांनी केले आहे. या बाबतची सविस्तर माहिती शासनाच्या policerecruitment2025.mahait.org व www.mahapolice.gov. in आणि www.maharashtrasrpf.gov.in संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
