पुणे येथील लेखिका आंतराष्ट्रीय खेळाडू डॉ.अंजली करवंदे-खानापूरकर यांची संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट
1 min read
नेवासे दि.२९:- नेवासे येथील एकेकाळच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाच्या अष्टपैलू विद्यार्थींनी माऊली कन्या डॉ.अंजली करवंदे-खानापूरकर यांनी माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेट देऊन माऊलींच्या “पैस”खांबाचे दर्शन घेतले.
माऊलींच्या दर्शनाने बालपणीच्या जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला तर आई वडील भेटल्याचा आनंद ही मिळाला असल्याची त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त व प्रमुख मार्गदर्शक वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के
यांच्या हस्ते अंजली करवंदे- खानापूरकर यांचा संत ज्ञानेश्वर माऊली स्थान महात्म्य पुस्तिका व शाल देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी मंदिर सेवेकरी शिवाजी आप्पा होन,दामोदर पवार, सामाजिक कार्यकर्ते सुधीर जामदार, पुणे येथील शैला वडापुरकर,प्रतिभा कळसकर, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.अंजली करवंदे- खानापूरकर म्हणाल्या की मी नेवासे नगरीची कन्या आहे याचा मला अभिमान आहे,शिक्षण घेत असतांना आम्ही गुरुवर्य बन्सी बाबांच्या सानिध्यात किर्तने श्रवण करत वैकुंठवाशी बन्सी बाबांनी केलेल्या प्रचार प्रसारामुळे माऊलींची कर्मभूमी नेवासे ही वारकरी संप्रदायाचे उगमस्थान बनले आहे.
आज माऊलींच्या पैस खांबाला आलिंगन देतांना मला आई वडील भेटल्याचा आनंद मिळाला माझ्या जन्मभूमीला मी कधीही विसरू शकत नाही धर्म कार्याला योगदान देत राहीन अशी भावना व्यक्त केली.
