मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छठ महापर्व

1 min read

मुंबई दि.२८:- मुंबईतील जुहू चौपाटी येथे छठ उत्सव महासंघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत छठ महापर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात छठ महापर्वच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छठ हे असे महापर्व आहे. ज्यामध्ये प्रथम मावळत्या सूर्याला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिले जाते. ते आपल्या संस्कृतीतील नम्रता आणि उदारतेचे अद्भुत प्रतीक आहे. छठ महापर्व हे भारतीय संस्कृतीचे एक अद्वितीय उदाहरण आहे. हे पर्व अनुशासन, पवित्रता आणि सामूहिक श्रद्धेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छठ महापर्वासाठी २०१४ पासून महानगरपालिकेच्या वतीने विविध सुविधा देण्याचे काम आम्ही करत आहोत. अशाच अधिक सुविधा दरवर्षी देत राहू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.या कार्यक्रमात आमदार अमित साटम, माजी आमदार कृपाशंकर सिंह, संजय पांडये, मोहन मिश्र, दिवाकर मिश्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!