जुन्नर तालुक्यात सोयाबिन हमीभाव केंद्र सुरु करा:- शिवाजी डुंबरे
1 min read
बेल्हे दि.२८:- जुन्नर तालुक्यात सोयाबीन चे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे परंतू सध्या सोयाबीनला ३५०० ते ४२०० भाव मिळत आहे. या अल्प दरामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत असून उत्पादन खर्चही निघत नाही. सरकार फक्त हमीभाव जाहिर करते.त्या हमीभावाची अंमलबजावनी करत नाही.
जुन्नर तालुक्यात एवढे सोयाबिन उत्पादीत होत असताना एकही सरकारचे हमीभावाने खरेदी केंद्र नाही. तरी सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या अखतेरीतील जुन्नर ओतुर व बेल्हे या ठिकाणी सरकारी सोयाबिन हमीभाव केंद्र सुरु करन्यात यावी अशी मागणी बेल्हे येथील शेतकरी शिवाजी डुंबरे व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याची आहे.
तरी तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी विद्यमान आमदार खासदार यांनी यात लक्ष घालून जुन्नर तालुक्यात वरिल तिनही ठिकाणी सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु करन्यासाठी प्रयत्न करावेत ही जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्याची विनंती आहे.
