माथेरान ला लवकरच होणार ई- रिक्षा सुरू
1 min read
मुंबई दि.२८:- माथेरान येथील पर्यटन विषयक पायाभूत सुविधांची कामे स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत. मा. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई- रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटनवाढीच्या दृष्टीकोनातून ई-रिक्षा सुरू करण्यासाठीची कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिल्या.
सह्याद्री अतिथीगृह येथे माथेरान येथील पर्यटनविषयक पायाभूत सुविधा व माथेरान मधील स्थानिक समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीला आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन विभागाचे प्रधानसचिव डॉ.अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी,पर्यटन संचालक डॉ.बी.एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे
व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, दूरदृश्यप्रणालीव्दारे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा चालकमालक संघटना माथेरानचे सचिव सुनिल शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यासह इतर संबधित अधिकारी उपस्थित होते.
