विद्या विकास मंदिरच्या माजी विद्यार्थांचा स्नेह मेळावा उत्साहात

1 min read

राजुरी दि.२८:- विद्या विकास मंदिर राजुरी सन 2009 इयत्ता 11-12 वी चा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा पिंपळवंडी येथील माही हाँटेलमध्ये असणाऱ्या माही सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. सुमारे दोन वर्षांपूर्वी राजुरी येथील शाळेत हा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा घेतला असल्याचे सिताराम कणसे यांनी सांगितले. तसेच आता दिपावलीच्या शुभ मुहूर्तावर गावी आलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र यावे या भावनेने हा कार्यक्रम अचानक योग जुळून आला.काही विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित राहीले, काही कालावधीनंतर वर्गातील सर्व विद्यार्थी आपल्या सहपरीवार एकत्र येऊन मोठा कार्यक्रम राजुरी शाळेत करणार असल्याचे कार्यक्रमादरम्यान ठरले. असल्याची माहिती श्रीहरी हाडवळे यांनी दिली यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या. सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीहरी हाडवळे यांनी केले तसेच सुत्रसंचलन संतोष कोरडे यांनी केले तर निलेश बांगर यांनी आभार मानले. सर्वांनी एकत्र स्नेह भोजन घेतले. जुन्या आठवणींना उजाळा दिला व कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!