केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईत स्वागत
1 min read
मुंबई दि.२७:- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे काल रात्री (दि. २७ ऑक्टोबर) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा सुरक्षा दलाच्या विमानाने आगमन झाले.
केंद्रीय मंत्री शाह यांचे स्वागत सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,
राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार अमित साटम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती तसेच राजशिष्टाचार विभाग व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
