२०२९ पर्यंत मीच मुख्यमंत्री:- देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.२४:- २०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार असून सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत कोणताही बदल होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. माझे कार्यक्षेत्र राज्यापुरतेच मर्यादित असून दिल्ली अजून दूर आहे, असेही ते म्हणाले. दिवाळीच्या पूर्वसंधेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्तेत असलेल्या भाजपा, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीत कोणताही फेरबदल होणार नसल्याचे सांगितले.ठाकरे ब्रँड शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब हेच असून दुसरा कुणीही होऊ शकत नाही, असा टोलाही त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना लगावला. मतदानानंतरही दोघे भाऊ एकत्रित राहतील अशी अपेक्षा असल्याचे फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!