श्री रेडा समाधी मंदिरात उद्या श्री गणेश व श्री रिद्धी सिद्धी मूर्ती शिलेचे पूजन
1 min read
आळेफाटा दि.२३:- आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी मंदिर या ठिकाणी दि.२४ रोजी श्री गणेश व श्री रिद्धी सिद्धी मूर्ती शिलेचे पूजन सोहळा होणार आहे. श्रीक्षेत्र आळे (ता.जुन्नर) येथील श्री रेडा समाधी मंदिरातील श्री गणेश व श्री रिद्धी सिद्धी मूर्ती शिलेचे पूजन तसेच धर्मध्वज भूमिपूजन सोहळा
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष तसेच गीता परिवार व महर्षी वेदव्याज प्रतिष्ठान मथुरेचे संस्थापक परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आळे
या ठिकाणी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रसन्न डोके, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कु-हाडे, व्यवस्थापक कान्हू कु-हाडे यांनी दिली.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सदस्य नेताजी डोके, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष,संदिप पाडेकर, सचिव जिवन शिंदे, खजिनदार संजय गुंजाळ,संतवाडी गावचे सरपंच नवनाथ निमसे, नागेश कु-हाडे, सुनिल जाधव,अमोल भुजबळ , संदीप निमसे,
गणेश शेळके,होणाजी गुंजाळ,गणेश गुंजाळ, रविंद्र गुंजाळ,राकेश शेळके,गबाजी गुंजाळ, रोहिदास निमसे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश कु-हाडे यांनी सांगितले की
श्री रेडा समाधी मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून सुमारे अंदाजे पाच ते सहा कोटी रूपये खर्च करून विणामंडप बांधकाम सुरू असून याच अंतर्गत श्री गणेश व रिद्धी-सिद्धी मूर्तींचे पूजन तसेच धर्मध्वज प्रतिष्ठा हा
महत्त्वाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची विशेष आकर्षणाची बाब म्हणजे श्रीराम मंदिर अयोध्या येथील कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची पवित्र उपस्थिती लाभणार आहे.
स्वामीजी हे गीता परिवार आणि महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, मथुरा चे संस्थापक आहेत व ते देशभरात गीतेचा संदेश पोहोचविणारे विद्वान संत म्हणून ओळखले जातात. त्यांचे आशीर्वचन आणि मार्गदर्शन या धार्मिक कार्यक्रमास अध्यात्मिक दिशा देणार आहे.
या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ आळे, संतवाडी, कोळवाडी व बारा बारशिकर यांच्या संयुक्त सहकार्याने आणि श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट (संस्था)
यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. परी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्यासाठी उपस्थित रहावे ही नम्र विनंती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.

