बिबट्याच्या हल्यात महिला ठार;नागरिक संतप्त

1 min read

जांबुत दि.२२- जांबुत (ता. शिरूर) थोरातवस्ती येथे बुधवार (दि.२२) रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात भागुबाई रंगनाथ जाधव या ७२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

भागुबाई जाधव या महिला सकाळी ६ वाजेच्या सुमारास लघुशंकेच्या निमित्ताने घराबाहेर आल्या असता घराच्या बाजूला दबा धरून बसलेल्या

बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना घरापासून पाचशे फुटावर असलेल्या उसाचे शेतात नेऊन ठार केले.

गेल्या आठ दिवसात बिबट्याच्या हल्ल्यातील मृत्यूची ही दुसरी घटना असून परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!