हट्टीहोळी गल्ली बुरजाईदेवी मंदिर येथे वसुबारस निमित्ताने गाय आणि वासरू पूजा

1 min read

बेळगाव दि.१८:- शुक्रवार दिवाळीचा पहिला दिवस, दिपावली हा सण सम्पूर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण दिव्यांचा, गोडाधोडाचा, अंधारावरील प्रकाशाच्या विजयाचा,आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस,शुभारंभ, प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही आम्ही गल्लीमध्ये हट्टीहोळी (बुरजाई )गल्ली बुरजाईदेवी मंदिरासमोर गाय आणि वासरू यांची पूजा करण्यात आली.तसेच श्री बुरजाईदेवीचे पूजन करण्यात आले. आपले शेतकरी बंधू वर्षभर शेतामध्ये आपल्या जनावरासोबत काबाडकष्ट करतात. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आज हा सण साजरा केला जातो.याप्रसंगीमाजी महापौर महेश नाईक रतन मुगळीकर ,सुभाष गवळी, अरुण राऊळ , श्रीकांत जाधव, प्रदीप गंधवाले, योगेश नेसरीकर, किरण गवळी, सविता मुगळीकर, दीपा नाईक, रेखा बाचीकर, अलका बाचीकर,आशा रावळ, सुमन आडाव,अश्विनी आडाव, यल्लूबाई रावळ, विमल जाधव, सुरेखा गंधवाले, ,सरोजा जाधव, विमल बाचीकर, सुजाता बाचीकर,करून पावशे, लक्ष्मी नाईक, लक्ष्मी नेसरीकर, महादेवी नेसरीकर, यमुना जाधव ,मयुरी शहापुरकर, कल्पना आडाव, अनुसया आडाव, कमल रावळ असे सर्वजण उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!