राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन;संवेदनशील नेतृत्व हरपले:- देवेंद्र फडणवीस

1 min read

राहुरी दि.१७:- ज्येष्ठ नेते, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन राहुरीसह, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात असल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्यंच्या निधनाने जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व हरपल्याचे त्यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे,सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्यानगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या आकस्मिक निधनाने राहुरी मतदार संघातील एक संवेदनशील नेतृत्व हरपले आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत. आमदार कर्डिले यांच्या निधनाने कर्डिले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याचे बळ मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!