अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती-भीमशक्तीचा जनआक्रोश मोर्चा

1 min read

अहिल्यानगर दि.१२:- सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी (ता. १२) रोजी अहिल्यानगर शहरात शिवशक्ती-भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.  आमदार संग्राम जगताप, सागर बेग, अॅड. वाल्मिक निकाळजे हे मोर्चाला उपस्थित राहणार आहेत.रविवारी सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरूवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चा निघणार असून मार्केट यार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, चौपाटी कारंजा मार्गे हा मोर्चा दिल्लीगेट येथे पोहाचणार आहे. दिल्लीगेट येथे मोर्चाची सांगता होणार आहे. दरम्यान, मुकुंदनगर येथे नुकतीच एमआयएमचे खासदार असुदद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली. या सभेत अनेकांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे उद्या होणाऱ्या मोर्चावेळी आमदार संग्राम जगताप हे काय बोलतात, याकडे अहिल्यानगरकरांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!