मापात काटा करुन शेतकऱ्यांचा वाटा घेणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात शेतकरी संघटना अधिक आक्रमक
1 min read
अहिल्यानगर दि.१२:- सहकार चळवळीतील साखर कारखानदार ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मापात पाप करुन घोटाळा घालण्याचा काळा उद्योग मोठ्या राणाभिमदेवी थाटात करत असल्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस पहिल्यांदा इतर वजन काट्यावर माप करुन आपल्या मर्जीप्रमाणे साखर कारखान्यात घालावा.
आणि जर ‘त्या’ कारखानदारांच्या वजन काट्यावर घोटाळा दिसल्यास त्याच वजन काट्यावरुन ऊस गाड्या माघारी वळवून पुन्हा दुसऱ्या साखर कारखान्यात ऊस घालण्याचा आक्रमक पाविञा घेण्याचा सल्ला शेतकरी संघटनेतून ऊस उत्पादक शेकऱ्यांना देत जनजागृती करण्यासाठी शेतकरी संघटना मोठी आक्रमक झालेली दिसून येत असून.
राज्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आलेले असतांना साखर कारखान्याच्या काटामारीवर प्रथमच उघडपणे भाष्य केल्यामुळे साखर कारखानदारीच्या मापात पाप करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंञी फडणवीस यांनीच अखेक शिक्कामोर्तब केल्यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक होतांना दिसत आहेत.
राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर नुकतेच आलेले असतांना त्यांनी साखरसम्राटांच्या काटामारीवर उघड भाष्य करत चांगलाच खरपूस समाचार घेतलेला होता सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून काटा मारीवर त्यांनी पहील्यांदाच आक्रमक पाविञा घेत उघडपणे भाष्य केल्यानंतर या काटा मारीत
तथ्य असल्याचे नुकतेच आता उघड झाल्यामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी संघटनाही अधिक आक्रमक होत पहिल्यांदा ऊस भावापेक्षा काटामारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे घामाचे दाम आणि त्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या भूमिकेचा शेतकरी संघटनेतून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत
सहकारातील कारखानदारांनी आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसऱ्या काट्यावर वजन करुन जर आपल्या कारखान्यात मापात पाप केल्यास त्याच काट्यावरुन ऊस गाड्या पुन्हा माघारी वळविण्याचा सल्ला देत कारखानदारांच्या मापात पाप करण्याच्या भूमिकेवर शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक झालेल्या असून
शेतकऱ्यांनी आपला स्वाभिमान जीवंत ठेवून आपल्या घामाच्या दामावर काटा मारुन वाटा घेण्याऱ्या साखर कारखानदारांना धडा शिकविण्याचा एकमुखी सल्लाही आता शेतकरी संघटनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देवून जनजागृती करण्याची मोहीम सुरु झाल्यामुळे मापात पाप करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणानले जाणार असल्याची चर्चा जाणकारांतून व्यक्त केली जात आहे.
‘ज्या’ साखर कारखानदारांची काटामारी उघड होईल? ‘त्या’ साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर आता शेतकरी संघटना बोंबाबोंब आंदोलन करण्याचा आक्रमक पाविञा शेतकरी संघटनेतून आता घेतला जाणार आहे त्यामुळे कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून असून
राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आलेले असतांना प्रथमच त्यांनी साखर सम्राटांच्या काटामारीवर लक्ष वेधल्यामुळे शेतकरी संघटना अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहेत.सहकार चळवळीतील साखर कारखानदारांचा जर सरळ कारभार सुरु असेल?
तर दुसऱ्या वजन काट्यावर माप करुन त्यांच्या साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तफावत उघड झाल्यास ‘त्याच’ काट्यावरुन या ऊसगाड्या माघारी फिरवून दुसऱ्या साखर कारखान्यात आपला ऊस घालण्याचा सल्लाही आता शेतकरी संघटनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला जात आहे.
त्यामुळे शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक होतांना दिसून येत असल्यामुळे कारखान्याचे धुराडे पेटलेले असतांना आता दामापेक्षा मापाचे बोला याबाबत शेतकरी संघटनेतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जनजागृती केली जात असल्यामुळे शेतकरी काय? भूमिका घेतात याकडे अनेकांच्या नजरा लागून राहीलेल्या आहेत.
