चतुर्थी दिनी घेतले हजारो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन
1 min read
ओझर दि.११:- अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे संकष्टी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी विघ्नहराच्या दर्शनाचा लाभ घेतला.पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनील घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे विश्वस्त संतोष कवडे, सुर्यकांत रवळे,विलास कवडे, समीर मांडे,शिल्पा जगदाळे यांच्या शुभहस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.मंदिरामध्ये चतुर्थी निमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान खुशाल शिंदे, अरुण वंडेकर,मोहन वंडेकर,विशाल शेट गोरे,ज्ञानेश्वर डोके यांना मिळाला. त्यांचे आभार श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब कवडे यांनी मानले.
सकाळी ७.०० वा. व दुपारी १२.०० वा. मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले.सकाळी १०.३० वा.’’श्री” स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आली. संकष्टी चतुर्थी निमित्ताने विघ्नहर मंदिरात फुलांची आरस विघ्नहराला रेशमी जरीचा पोशाख करण्यात आला होता.
तसेच सोन्याचे अलंकार श्री विघ्नहराला परिधान करण्यात आले. व येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग,पाणी पिण्याचे व्यवस्था,अभिषेक व्यवस्था. देणगी कक्ष ,अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था,दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान ,चप्पल स्टॅन्ड पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी ७.०० वा. नियमित हरिपाठ करण्यात आले. व चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प.माऊली महाराज कुसूरकर, कुसूर यांचे हरिकीर्तन झाले.त्यांना साथसंगत श्रीराम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली.आजचे अन्नदाते भास्कर/ विलास देवराम मांडे ,ओझर यांनी चतुर्थीचे वारकरी अन्नदान केले रात्रौ १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.
आजच्या महाआरतीच्या मानकरी यांनी विकास कामात सहभागी होवून ट्रस्ट ला देणगी दिली. आलेल्या भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे,सचिव सुनील घेगडे,खजिनदार दत्तात्रय कवडे,विश्वस्त, प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे,
गोविंद कवडे,विक्रम कवडे, समिर मांडे, विनायक मांडे, संतोष कवडे, विलास कवडे, विनायक जाधव, मंगेश पोखरकर,शिल्पा जगदाळे, यांनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्ट चे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.