निमगाव सावात बिबटया अडकला पिंजऱ्यात

1 min read

आणे दि.११:- निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील शेकेमळ्यात वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (ता.१०) पहाटेच्या सुमारास बिबट्या अडकला. सुमारे चार वर्षांचा हा नर जातीचा हा बिबट असल्याची माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.निमगाव सावा परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात बिबट्याकडून पशुधनावर खाल्ल्याच्या अनेक घटना घडल्याने या परिसरात वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.शेकेमळावस्तीमध्ये पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले. आकाश डोळस, रेस्क्यू टीमचे सदस्य ऋषी गायकवाड, फिरोज पठाण, शुभम भोर केंद्रीय यांनी यावेळी मदत केली. वनरक्षक महेश जगधने, किरण गोत्राळ, गणेश गाडगे, सुनिल गहिने, निलेश गाडगे यांनी बिबट्याच्या बाबतीत ग्रामस्थांना मार्गदर्शन करून जनजागृती केली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!